विविध सोयी व सवलती

शिष्यवृत्ती व फी सवलत :-
महाविद्यालयात प्रवेश घेणाऱ्या विधार्थाना खालील सवलती व शिष्यवृत्ती उपलब्ध आहे .
१. आर्थिक दृष्ट्र्या मागासलेल्यासाठी शुल्क माफीची सवलत (ई. बी. सी. कन्सेशन) याकरिता आई वडिलांचे सर्व मार्गाने मायणारे उत्पन रु.
८,००,०००/- चे आत असावे व हजेरी प्रमाणपत्र ७५ टके असावे. विशिष्ट नमुन्यात आवश्यक प्रमाणपत्र ओंलीने भरून अर्जाची प्रत महाविद्यालयामध्ये जमा करावी. सोबत उत्पनाचे समक्ष प्रमाणपत्र जोडावे.

२. प्राथमिक व माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मुलांना महाविद्यालयीन शुल्कामध्ये सवलत देण्यात येईल. त्यांच्याकडून प्रवेशाचा वेळी प्रवेश शुल्क , विद्यापीठाचे शुल्क व ओडखपत्र शुल्क घेण्यात येईल. तसेच त्यांचे ईबीसी सवलतीप्रमाणेच अर्ज भरून घेण्यात येईल .

३. फ्रीशिप सवलत :- ज्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे उत्पन्न मर्यादेपेक्षा जास्त असेल त्यांना फ्रीशिप सवलत घेता येईल.
४. शिष्यवृत्ती :-
१. भारत सरकारची अनुसुचित जाती , अनु. जमाती ,नवबौध्द ,भटक्या वन्य व विमुक्त जातीच्या विध्यार्त्याना मिळणारी शिष्यवृत्ती.
२. इतर मागासवर्गीय विध्यार्थ्यांना मिळणारी शिष्यवृत्ती.
३. माजी सैनिक / स्वात्रंत संग्राम सैनिकांच्या मुलांना मिळणारी शिष्यवृत्ती.
४. अपंग विध्यार्थाना मिळणारी शिष्यवृत्ती.
५. भारत सरकारची मेरिट शिष्यवृत्ती.
६. अल्पसंख्याक शिष्यवृत्ती.

शिष्यवृत्तीसाठी उत्पन्न मर्यादा :-
अ. अनु. जाती ,अनु. जमाती -शिष्यवृत्ती - रु २,००,००० /- पर्यंत.
ब. इ. मा. वा. आणि विमुक्त जमाती व एस. बी. सी. - रु १,००,००० /- पर्येंत.
क. फ्रीशिप शिष्यवृत्तीकरिता उत्पन्न मर्यादा रु - ८,००,००० /- पर्येंत.
ड. इ. बी. सी धारक विध्यार्थाना उत्पन्न मर्यादा रु. ८,००,००० /- पर्येंत.

शिष्यवृत्ती प्राप्त करण्यासाठी अटी व कागजपत्रे. १. विद्यार्थ्यांची महाविद्यालयातील उपस्थिती ७५ टक्कयापेक्षा कमी नसावी.
२. शिष्यवृत्ती username आणि password नंबर.
३. ऍडमिशन पावती (झेराक्स प्रत)
४. एस.एस.सी मार्कशीट (झेराक्स प्रत)
५. एच. एस. सी. मार्कशीट (झेराक्स प्रत)
६. बी. ए. / बी. कॉम. / बी. ऐशी. मार्कशीट (झेराक्स प्रत)
७. जातीचे प्रमाणपत्र.
८. टी.सी. (झेराक्स प्रत)
९. बँक खात्याची (झेराक्स प्रत)
१०. आधार क्रमांक.
११. १०० रु. स्टॅम्प पेपर वर गॅप सर्टिफिकेट.
१२. उत्पन्न प्रमाणपत्र.
१३. गॅप असल्यास १०० रु. स्टॅम्प पेपर वर गॅप सर्टिफिकेट.
१४. पासपोर्ट सिझे फोटो.
१५. राशन कार्ड (झेराक्स प्रत)
१६. आधारकार्ड बँक खात्याशी सलंगरीत करून बँकेतून पोच पावती आणावी.
१७. डोमेशियेल सर्टिफिकेट.

अर्ज योग्य नमुन्यात आवश्यक कागजपत्रासह सादर करणे अवश्यक आहे. या शिवाय विध्यार्त्यासाठी शिष्यवृत्तीचे काम पाहणाऱ्या लिपिकाकडे या संबंधी संपूर्ण माहिती उपलब्ध राहील. तसेच सूचना फलकावर वेळोवेळी माहिती पुरविण्यात येईल. ज्या विधार्थानी दिलेल्या तारखेचा आत शिष्यवृत्ती फार्म सादर केलेला नाही किंवा फार्म भरण्यापासून वंचित राहिल्यास शिक्षण शुल्क भरावे लागेल.