Don't have an account?
Sign up as a User
विदर्भभूमी आपल्या वेगवेगळ्या समृद्ध ऐतिहासिक , सामाजिक ,शैक्षणिक ,वैशिष्ट्यांबरोबर 'सांस्कृतिक वैभव' जतन करून आलेली आहे. अशाच संतश्रेष्ठ श्री लटारे महाराज यांच्या वास्तवाने पुनित झालेल्या या डोंगरी कुशीत वसलेल्या तसेच चोपद्री राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ चा वारस लाभलेल्या कारंजा (घाडगे) या छोट्या शहरवजा गावात स्व. दादासाहेब काळे, स्व. केशवराव शेटे, स्व. बापूसाहेब देशमुख यांच्या अथक परिश्रमाने १९८९ ला या महाविद्यालयाचे छोटेसे रोपटे लावण्यात आले आहे. कारंजा आणि आजूबाजूच्या ग्रामीण परिसरातील सामान्य विध्यार्थी उच्य शिक्षणापासून वंचित राहू नये, त्यांच्या शिक्षणाची स्थानिक पातळीवर सोय व्हावी, हाच या महाविद्यालयाच्या निर्मिती मागचा प्रामाणिक हेतू होता. महाविद्यालयात आज कला, वाणिज्य व विज्ञान या तीनही विद्याशाखा आहेत. एम. ए. अर्थशास्त्र हा 'पद्युत्तर विभाग' हि सुरु करण्यात आलेली आहे. तसेच अर्थशास्त्र या विषयकरिता विद्यापीठाने 'संशोधन केंद्रा'चीही मान्यता दिली आहे. २१ व्या शतकातील माहिती व तंत्रधानाचे मानवी जीवनातील महत्व लक्ष्यात घेऊन महाविद्यालयात स्वतंत्र 'संगणक विभाग' हि कार्यरत आहे